Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात  विशाल अग्रवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा विशाल अग्रवालविरोधातील सहावा गुन्हा आहे. विशाल अग्रवाल सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोर्शे कार अपघातातील आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालविरोधात आज आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००७ साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रम्हा सोसायटीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अग्रवालविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News : फी न भरल्यामुळे १०० विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

सोसायटीधारकांना पार्किंग, मोकळी जागा देणे बंधनकारक असताना एकाच ठिकाणी अँमिनीटी स्पेस आणि मोकळी जागा दर्शवून सोसायटीधारकांची परवानगी नसताना बिल्डरने ११ मजली आणि १० मजली इमारत बांधली होती. याप्रकरणी विशाल अग्रवाल, राम अग्रवाल, विनोद अग्रवाल, नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वीच आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात कोंढवा 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply