Pune Politics News : पुण्यात भाजपला मोठा धक्का, गिरीष बापट यांचे निकटवर्तीय शरद पवारांच्या गळाला

Pune Politics News : लोकसभा निवडणुकीपूर्वी पुणे शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय सुनील माने यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. लवकरच ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. पुण्यातील मोदी बागेत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुनील माने यांना ओळखले जात होते. दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे निकटवर्तीय असलेल्या माने यांना राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. गिरीष बापट खासदार असताना त्यांनी सर्वसामान्यांची कामे करत मतदारांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं होतं. 

Pune Exclusive : ड्रग्ज प्रकरणी नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी; गुन्हे शाखेची पहाटेपासून कारवाई, १० पथके तैनात

शिवाजीनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास माने इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. याच नाराजीतून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. आज ते शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार आहेत.

शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. माने यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून माने यांना पुणे लोकसभेचं तिकीट मिळणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply