Pune Politics : पुण्यातील वेताळ टेकडीवरुन नवा वाद, भाजपमधील दोन नेत्यांची एकमेकांच्या विरुद्ध भूमिका

पुणे महानगरपालिकेतील विकास प्रकल्पावरुन नवा वाद समोर आला आहे. हा वाद केवळ स्थानिकांपुरता मर्यादीत नाही तर एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये हा वाद आहे. भाजपमध्ये या विकास प्रकल्पावरुन परस्परविरोधी भूमिका घेतली गेली आहे. या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे.

कोथरुड-पाषाण आणि सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंजूर केले आहेत. हे बोगदे बनल्यास पुण्याचा दक्षिण भाग आणि पुण्याचा उत्तर भाग यादरम्यान प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु या प्रकल्पाला मोठा विरोध होताना दिसत आहे.

कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे बनवण्यासाठी वेताळ टेकडी फोडून बोगदे तयार करावे लागणार आहे. वेताळ टेकडी फोडण्याचा या निर्णयास पर्यावरण प्रेमींचा विरोध होत आहे. पुण्यातील वेताळ टेकडी फोडून कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय घेतला आहे.

बोगदे बनवण्यासाठी वेताळ टेकडीवरील तीन हजार झाडे तोडावी लागणार आहे. वृक्ष तोडीचा परिणाम या टेकडीच्या भोवताली असलेल्या जैव विविधतेवर होणार आहे, असा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे. प्रकल्पासाठी येणार एकूण साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

वेताळ टेकडी फोडून कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याच्या या निर्णयाला भारतीय जनता पक्षातील नेत्यांची परस्पर विरोधी भूमिका आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. मात्र पुणे शहरातील रहिवाशी आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान हे बोगदे झाल्यास पुण्याचा दक्षिण भाग आणि पुण्याचा उत्तर भाग यादरम्यान प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply