Pune Police : पुणे शहरात पोलिसच असुरक्षित?, कार अडवल्याचा राग; थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी

Pune : पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यामध्ये हिट अँड रन प्रकरणाच्या घटना वारंवार घडत आहेत. अशामध्ये आता गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या पुणे पोलिसांनाच मारहाण केली जात असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसच असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यामध्ये कार अडवल्याचा राग आल्याने तरुणांनी दोन पोलिसाला मारहाण करत धमकी दिली. पुण्यातील सिंहगड रोडवर ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी -शिवनगर रस्ता याठिकाणी वाहतूक कोंडी होते. दरम्यान रविवारी वाहतूक कोंडी हटविण्यासाठी पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड आणि आर. सी. फडतरे हे त्याठिकाणी ड्युटीवर होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून ऋषिकेश गायकवाड यांनी ती कार थांबवून रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले.

Mihir Shah Arrested : मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, आईलाही घेतलं ताब्यात

कार अडवल्याचा कारचालक मंगेश फडके या तरुणाला राग आला. त्याने पोलिसांसोबत अरेरावी सुरू केली आणि कार बाजूला घेण्यास नकार दिला. मंगेश फडकेने कार तशीच रस्त्यामध्ये उभी केली आणि त्याने पोलिसांशी वाद घालण्या सुरूवात केली. कार रस्त्यावर उभी ठेऊन मंगेश खाली उतरला आणि त्याने 'मी कोण आहे तुला माहित नाही. तू नोकरी कशी करतो तेच बघतो.' असे म्हणत पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

यावेळी दुसरे पोलिस अंमलदार आर. सी. फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावून आले. तेव्हा कारमध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी हा कारमधून उतरला आणि त्याने फडतरे यांना मारहाण केली. दोन्ही तरुणांनी या पोलिसांना मारहाण केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्याविरोधात हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply