Pune : पोलीस रडारवर; चिरीमिरी घेताना आढळल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार, पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Pune : पोलिसांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. आता पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. कारण नागिकांकडून लाच किंवा चिरीमिरी घेताना आढळल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे पाऊल उचललं आहे.

पुण्यात गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी फक्त गुन्हेगारच नाही, तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर पोलिसांनी आता नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले, तर आता पोलिसांवरच पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. नागरिकांकडून जर विनाकारण पैसे घेताना आढळून आल्यास पोलिसांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Navi Mumbai Crime : संतापजनक! निर्दयी बापाने ५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले, तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला जाणार आहे. या कारवाईकरिता काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. कारण यापूर्वी वाहतूक पोलीस नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते. त्यानंतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु आता थेट अशा कर्मचाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

हे पोलीस कर्मचारी साध्या नागरी वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का? याची या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. एखादा पोलीस कर्मचारी असा गैर प्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply