Pune Police : पुण्यातील 85 'VIP' राजकारण्यांची सुरक्षा काढली; पुणे पोलीस आयुक्तांचा निर्णय, काय आहे कारण?

Pune Police : पुणे पोलिसांनीशहरातील एकूण ११० जणांना पोलीस सुरक्षा पुरवली होती. त्यापैकी ८५ जणांची पोलीस सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यासोबत अनावश्यक अशा शहरातील २३ ठिकाणांवरील देखील सुरक्षा गार्ड काढण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार  यांनी हा निर्णय घेतला आहे. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय स्थरावर असलेले अध्यक्ष, प्रमुख तसेच नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ  उडाली होती.

Navjot Singh Sidhu : ठोको ताली! लोकसभा नाही तर IPL च्या मैदानात नवज्योत सिंग सिद्धूची एन्ट्री... बदलली भूमिका

संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षक

पुणे शहरात एकूण ११० लोकांना राजकीय सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यापैकी ८५ लोकांची सुरक्षा काढली आहे. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयामुळे तब्बल ३५० पोलीस कर्मचारी हजर झाले आहेत. परिणामी याचा फायदा पोलिसींगसाठी होणार आहे. महत्त्वाच्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षक कायम ठेवण्यात आले आहेत.

जास्त आवश्यकता नसलेल्या २३ ठिकाणांचे सुरक्षा रक्षक हटवले गेले आहेत. पुणे पोलिसांकडे ५४ जणांनी पोलीस सुरक्षा पुरवावी, अशा प्रकारचे अर्ज केले होते. यासंबंधित अर्ज देखील रद्द करण्यात आलेले  आहे. ज्या व्यक्तींकडे कायदेशीर खासगी पिस्तूल आहेत, त्यांच्याकडून पिस्तूल जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

गुन्हेगारी संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू

मागील काही दिवसांत पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. तसंच पुणे शहरात वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले १६ हजार गुन्हे आहेत. त्यांना तातडीने संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तीन महिन्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांची संख्या १२ ते १३ हजार आहेत. हे गुन्हे तातडीने मार्गी लावण्यासाठी तक्रारदारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply