Pune PMPML : पुण्यात PMPL करणार नव्या मार्गांचा विस्तार; बसप्रवास होणार आणखी सुखकर

Pune PMPML  : पुणेकरांचा बस प्रवास आता आणखी सोप्पा आणि सोइस्कर होणार आहे. PMPL बसच्या एकूण सहा मार्गांच्या विस्ताराची घोषणा करण्यात आलीये. शहरातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता PMPL प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

विस्तार होणाऱ्या ६ मार्गांची नावे पुढे दिली आहेत.

स्वारगेट ते नांदेडगाव मार्गाचा विस्तार बागेश्री सोसायटीपर्यंत

इंटरनिटी कंपनी (हिंजवडी) ते शिवाजी चौक या मार्गाचा विस्तार मुकाई चौकापर्यंत

दिघी ते भोसरी मार्गाचा विस्तार पिंपरी मेट्रो स्टेशनपर्यंत

हडपसर ते वडकीगाव मार्गाचा विस्तार मस्तानी तलावापर्यंत

नऱ्हेगाव ते स्वारगेट मार्गाचा विस्तार सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत

सेक्टर क्र.१२ ते भोसरी मार्गाचा विस्तार नाशिक फाटा मेट्रो स्टेशनपर्यंत

Pune Accident : पुण्यातील मार्केट यार्ड भागात भीषण अपघात; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, महिला जागीच ठार

आषाढी वारीसाठी पुण्यातून धावणार पावणेतीनशे बस

१७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशी निमित्त दरवर्षी लाखो वारकरी मंडळी यात्रेसाठी निघालेली असतात. त्यामुळे वारकऱ्यांसाठी राज्यातून ५ हजार बसचे नियोजन करण्यात आले आहे. तर पुण्यातून पावणेतीनशे बस सोडल्या जाणार आहेत.

आषाढी यात्रेसाठी राज्यातून ५ हजार आणि पुणे विभागाकडून पावणेतीनशे जास्तीच्या बस सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. स्वारगेट, शिवाजीनगर विभागातील 14 डेपोतून जास्तीच्या बस सोडण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातून आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे मुंबई,रायगड आणि पालघर विभागातून जादा बस मागविण्यात आल्यात. १७ जूनला आषाढी एकादशी असून दोन दिवस आधी बस सोडल्या जातील. आषाढी एकादशीच्या दिवशी पावणेतीनशे बस सोडल्या जातील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply