Pune News : विजय शिवतारेंच्या मागणीला यश; अखेर फुरसुंगी, उरुळी देवाची पुणे महापालिकेतून बाहेर

Pune News :   पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गावं वगळण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकार कडून नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. सत्तांतर झाल्यानंतर माजी आमदार विजय शिवतारे यांनी या दोन्ही गावांच्या बद्दल मागणी केली होती. याबाबत पुणे महानगरपालिकेने राज्य सरकारला सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. यावर विचार करून राज्य सरकार ने आज नवीन आदेश काढून  फुरसुंगी आणि उरळी देवाची या नवीन नगर परिषद असतील असे जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जे बोलून दाखवले होते. ते खरे करून दाखवले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

शिवतारेंच्या मागणीला यश

पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे. महापालिकेत समावेश केल्यानंतर या दोन्ही गावांच्या विकासाकामांना वेग आला होता. मात्र महापालिकेत समावेश करुनही पायाभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या गावासाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळावयाचे क्षेत्र –

1) फुरसुंगी – स.नं. 193, 192पै, 194, 195पै (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र

2) उरूळी देवाची – स.नं. 30, 31व 32पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसुली गावाचे क्षेत्र.

पुणे महानगरपालिकेची सुधारित हद्द

उत्तर – कळस, धानोरी व लोहगाव या महसुल गावांची हद्द.

उत्तर पूर्व – लोहगाव, वाघोली या महसुल गावांची हद्द.

पूर्व – मांजरी बु., शेवाळेवाडी, हडपसर या महसूली गावांची हद्द व फुरसुंगी महसुली गावातील कचरा डोपोची हद्द.

दक्षिण पूर्व – महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसूली गावांची हद्द व उरूळी देवाची महसुली गावातील कचरा डेपोची हद्द.

दक्षिण – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या महसूली गावांची हद्द.

दक्षिण-पश्चिम – पश्चिमेस नांदेड, खडकवासला, नांदोशी सणसनगर, कोपरे या महसुली गावांची हद्द.

पश्चिम – कोंढवे धाडवे, बावधन बु. व खुर्द, म्हाळुंगे, सुस या महसुली गावांची हद्द.

पश्चिम-उत्तर – बाणेर, बालेवाडी या महसुली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply