Pune : आमच्यावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये, माळीणवासीयांची भावना; दुर्घटनेच्या नऊ वर्षांनंतरही वेदना कायम

फुलवडे - माळीण (ता. आंबेगाव) येथील दुर्घटनेला रविवारी (ता. ३०) नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, मन सुन्न करणाऱ्या दुर्घटनेच्या पहाटेची आठवण काढली की आजही माळीणवासीयांच्या अंगावर शहारे उभे राहतात. या आठवणी माळीणवासीयांना आजही वेदना देऊन जातात. ‘आमच्यावर जी वेळ आली, ती कुणावरही यायला नको,’ अशी भावना माळीणकर व्यक्त करतात.

माळीण येथे ३० जुलै २०१४ रोजी डोंगरकडा आमच्यावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली ४४ घरे गाडली गेली. त्यात १५१ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ९०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये आणि खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथेही भूस्खलनाच्या घटना झाल्या.

त्यातून माळीणकरांच्या नकोशा आठवणी ताज्या झाल्या. या आठवणी त्यांचे मन सुन्न करून जातात. तरीही तळीये येथील दुर्घटनाग्रस्तांना माळीणकरांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून २५ हजारांची मदत केली.

आपली जखम भळभळती असतानाही दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी देखील मदत करणार असल्याचे माळीणकरांनी सांगितले.

माळीणचे पुनर्वसन होऊन सात वर्षे झाली, परंतु गावाची सीमा निश्चित करून ग्रामपंचायतीकडे गावठाण हस्तांतर झाले नाही. त्यामुळे गावाच्या विकासाच्या योजना राबविणे अडचणीचे होते आहे.

गावात जागा असूनसुद्धा चौदा कुटुंबांना घरे बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. शेडमध्ये राहात असलेल्या कुटुंबाला घरकुल मंजूर असूनदेखील गावठाण ग्रामपंचायतीला हस्तांतरीत झाले नसल्यामुळे घर बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर गावठाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतर व्हावे. म्हणजे गावच्या विकासाला चालना मिळेल.

Pune ATS : अल सुफा दहशतवादी प्रकरणात चौथी अटक; संशयित रत्नागिरीतला, 'एटीएस'कडून कसून तपास सुरु

- रघुनाथ झांजरे, सरपंच, माळीण (ता. आंबेगाव)

माळीण स्मृतिवनातील प्रत्येक गोष्टीत आमच्या भावना गुंतल्या आहेत. स्मारक उघड्यावर आहे. ऊन, वारा, पावसाने आणि पक्ष्यांच्या विष्ठेने स्मारकाचे नुकसान होत आहे. स्मारक सुरक्षित राहिले पाहिजे. त्यामुळे स्मारकावर छत्र लावावे.

- मच्छिंद्रनाथ झांजरे, ग्रामस्थ, माळीण (ता. आंबेगाव)



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply