Pune : वाघोलीतील बेला व्हिटा सोसायटीत ड्रेनेजचे पाणी, आरोग्याच्या प्रश्नांनी सोसायटीधारक हैराण

Pune - वाघोली येथील प्रियांकानगरी परिसरातील बेला व्हिटा सोसायटीत ड्रेनेजचे पाणी साचत असल्याने सोसायटी धारकांचे हाल होत आहे. पावसामुळे या पाण्यात अधिक भर पडत आहे. आता सोसायटी धारकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. वर्षभरात सोसायटी धारकांनी अनेक तक्रार करूनही त्याची दखल महापालिका घेत नाही. असे सोसायटी धारकांनी सांगितले.

त्यांच्या सोसायटी परिसरातून सार्वजनिक ड्रेनेज वाहिनी गेलेली आहे. त्याचे पाणी रेन हार्वेस्टिंग केलेल्या सोसायटीच्या टाकीत जात आहे. या टाकीच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. ते पाणी या पिण्याच्या पाण्यात पाझरत असल्याने सोसायटी धारकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

याबाबत सोसायटी धारकांनी महापालिका, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय, वाघोली कार्यालय सर्व ठिकाणी तक्रार केली. महापालिका कर्मचारी पाहणी करून गेले. मात्र त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही. कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजचे झाकण उघडून पाहिले.

ते झाकनही उघडलेल्या त्याच स्थितीत आहे. या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. सोसायटी धारक डेंगू, मलेरियाने आजारी पडत आहे. मात्र महापालिका लक्ष देत नसल्याचे सोसायटी धारकांचे म्हणणे आहे.

ड्रेनेज पाण्यामुळे सोसायटी धारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तक्रार करूनही महापालिकेने कार्यवाही केलेली नाही. – संतोष कडलग, सोसायटीधारक

त्या सोसायटी पर्यंत ड्रेनेजचे काम झाले आहे. पुढे त्या वाहिनीचे काम करायचे आहे. त्याचा निधीही मंजूर आहे. सोसायटी धारकांशी चर्चा करून पुढे वाहिनीचे काम पूर्ण केले जाईल.

संजय शिवले, वाघोली कार्यालय अधीक्षक.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply