Pune : मालकीच्या वादामुळे पुण्यातील हॉटेल पुन्हा चर्चेत! बिलाबद्दल ग्राहकांना दिल्या विशेष सुचना; पोस्टरने वेधले लक्ष

Pune : काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलची मालकी जबरदस्तीने बळकावण्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर हे हॉटेल चांगलेच चर्चेत आले होते..या हॉटेलवर मालकी कोणाची? हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे.

या प्रकरणी हॉटेल मालकाच्या मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता हॉटेलबाहेरील फ्लेक्सने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलचा बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने ताबा घेतल्याची घटना समोर आली होती. ज्यानंतर शहरात खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा हे हॉटेल चर्चेत आले असून हॉटेल बाहेर लागलेल्या पोस्टरने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

या हॉटेलच्या बाहेर खवय्यांसाठी हॉटेल बाबत जाहीर सूचना देणारे फलक लावले आहेत. त्यावर हॉटेलच्या मालकी बाबतच मजकूर लिहला आहे. तसेच हॉटेल बिल देताना पैसे कॅश स्वरूपातच स्वीकारले जातील असेही पोस्टर लावण्यात आले आहेत. 

दरम्यान, हॉटेल मालकाच्या मुलीने तिच्या पतीवरच बंदुकीचा धाक दाखवून पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतल्याचा आरोप केला आहे. या माध्यमातून त्याने हे हॉटेल स्वत:च्या नावावर करून घेतल्याचे देखील तिने म्हटले आहे.

एवढेच नाही तर लग्नाआधी पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *