Pune : पुण्यात मुळा नदीवर नवा पूल; दोन शहरांना थेट जोडणी, वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा

Pune : वाकड येथील कस्पटे चौक ते बालेवाडीदरम्यान मुळा नदीवर उभारला जात असलेला पूल अखेर पूर्णत्वाकडे आला असून, हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास पिंपरी-चिंचवड व पुण्यातील दळणवळण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Railway : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद केलेली सुविधा ठरली महागात; रेल्वेला मोठा फटका, १४ स्थानकांवर परिणाम

पुण्यातील दोन प्रमुख शहरांना जोडणारा महत्त्वाचा पूल
दोन शहरांना थेट जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलामुळे प्रवासाचे अंतर व वेळ वाचेल. पिंपळे निलख, रावेत, वाकड, चिंचवड अशा भागांतून बालेवाडीकडे प्रवास करणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरही नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुलाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून, बालेवाडीच्या दिशेने उर्वरित काम भूसंपादनाच्या अडचणीमुळे रखडले होते. मात्र, संबंधित अडथळे दूर होत असून, पुढील काही दिवसांत हे कामही पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे वाकड व बालेवाडी हे दोन भाग थेट जोडले जातील. आयटी पार्क, निवासी संकुले, शिक्षण संस्था व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सुखकर प्रवासासाठी मोठा फायदा होणार आहे.

सध्या या मार्गाला पर्याय म्हणून सद्यस्थितीत चालू असणाऱ्या रस्त्यांवरची होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन सोयीचा मार्ग उपलब्ध होणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत हे काम हाती घेण्यात आले असून, पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा नदीवरील पुलाचे बांधकाम आधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. तसंच या पुलामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येपासून, वाहनांच्या गर्दीतून काहीसा दिलासा मिळू शकतो.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : पुण्यात मुळा नदीवर नवा पूल; दोन शहरांना थेट जोडणी, वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *