
Pimpri-Chinchwad : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे ‘आका’ असल्याचा आरोप भाजप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या आकाला संपवायचं आहे, असा थेट इशारा अजित पवारांनी दिल्यानंतर आज आमदार महेश लांडगे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. 70 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून महेश लांडगे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. “70 हजार कोटींचा घोटाळा करणारे अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका आहेत. आम्हीही पुराव्यानिशी आरोप करू, पण ते आरोप त्यांना सहन होणार नाहीत,” असं लांडगे म्हणाले.
“उमेदवारी मागायला कुणी येत नसल्याने अजित पवार चिडचिड करत आहेत. चिठ्ठी वाचून स्क्रिप्टेड भाषण करणं ही त्यांची सवय झाली आहे. त्यांच्याकडे मोठे डायरेक्टर आणि चाणक्य असतील, पण बिनबुडाचे आरोप करू नयेत,” असा इशाराही महेश लांडगे यांनी दिला. "1991 पासून अजित पवार पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय असून ते कायम सत्तेत राहिले आहेत. ते राज्याचं नेतृत्वही करू शकले, मात्र त्यांनी नेमकं काय केलं? उंटावर बसून शेळ्या हाकण्याचंच काम केलं,” असा घणाघात लांडगे यांनी केला.
|
|
“शरद पवारांमुळेच अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आले आणि त्यांची ओळख निर्माण झाली. मात्र आज तेच अजित पवार शरद पवारांना सोडून भाजपसोबत आले आहेत. भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपसोबत आले आहेत का?” असा थेट सवालही लांडगे यांनी उपस्थित केला.
“माझ्या संपत्तीवर बोलण्याऐवजी अजित पवारांनी स्वतःची जुनी आणि सध्याची परिस्थिती पाहावी. ते गेली 25 वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत,” असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या संपत्तीकडेही बोट दाखवलं.
अजित पवारांनी नेहमीच स्थानिक भूमिपुत्रांना डावललं असून कुणालाही मोठं होऊ दिलं नाही, असा आरोप करत “सध्या राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यांना 128 उमेदवारही मिळाले नाहीत. स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं हीच त्यांची वृत्ती आहे,” अशी टीका महेश लांडगे यांनी केली.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
“महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या आकाला संपवायचं आहे. त्या आकाला जागा दाखवायची आहे,” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार महेश लांडगे यांचं नाव न घेता टीका केली होती. याच वक्तव्याला प्रत्युत्तर देत आज आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Pune : अजित पवारांवर गंभीर आरोप; ‘महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा सूत्रधार’ म्हणत भाजप आमदार महेश लांडगे यांचा जोरदार हल्लाबोल”