
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक पार पडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्राथमिक स्तरावर एकमत झाल्याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी या बैठकीची माहिती देताना सांगितलं की, 'अजित पवार यांच्या सूचनेनंतरच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत प्रामुख्याने जागा वाटपाचा तिढा सोडवण्यावर चर्चा झाली असून तो लवकरच मार्गी लागेल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे , आमदार रोहित पवार आणि शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते. तर अजित पवार गटाकडून अजित गव्हाणे हे सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांचे उमेदवार जिंकू शकतील, अशाच जागांवर उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
|
|
अजित गव्हाणे यांनी स्पष्ट केलं की, 'अद्याप कोणताही अंतिम फॉर्म्युला ठरलेला नसून, महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न राहील. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल', असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीबाबत फारसे भाष्य करण्याचं टाळलं. 'ही फक्त मैत्रीपूर्ण बैठक होती,' असं सांगत त्यांनी राजकीय चर्चेवर मौन बाळगलं. मात्र, 'राजकारणात काहीही होऊ शकतं,' असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
शहरात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने या हालचाली सुरू असल्याचं स्पष्ट होत असून, शिवसेना आणि मनसे तसेच इतर काही पक्षही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती अजित गव्हाणे यांनी दिली आहे. खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे अजित पवारांची भेट घ्यायला गेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादीविषयी त्यांच्यात चर्चा होणार आहे. या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

