Pune : पुणे महापालिका आणि बँकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर अखेर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेकेदारास ताब्यात घेतल्यानंतर खोटे शिक्के आणि बनावट एफडीआर कागदपत्रे कोठून तयार केली, यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याची महत्वाची माहिती तपासात पुढे येणार आहे. सलीम गाजीबक्ष बांगी (रा. लक्ष्मीनगर, येरवडा, सध्या रा. लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्यावर सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या तयार करणे आणि पालिका, बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
कनिष्ठ अभियंता माधुरी ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे. पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये निविदा मिळविण्यासाठी आरोपी बांगी याने युनियन बँकेच्या वीस लाख रुपयांच्या बनावट मुदत ठेव पावत्या पालिकेला सादर केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, शाखा प्रमुख शशी साटोटे यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. लोहगाव टाईम्स सह अनेक माध्यमांनीही हे प्रकरण लावून धरले होते.
|
|
संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावर चौकशी झाल्यावर ठेकेदाराने बनावट मुदत ठेव पावत्या देऊन पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दोषी ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून पाच कामांची बयाणा रक्कम जप्त करणे आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावे, असे आदेश दिले होते.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. अखेर आठ दिवसांनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर बनावट मुदत ठेव पावत्या सादर करणाऱ्या ठेकेदारावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
खोटे शिक्के वापरून बनावट मुदत ठेव पावत्या सादर करणाऱ्या आरोपीवर कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ठेकेदार अटक झाल्यावर खोटे शिक्के आणि बनावट एफडीआर कुठे तयार केली, यामध्ये कोणाचा हात आहे, तसेच आणखी किती लोकांना बनावट कागदपत्रे तयार करून दिली, याचा तपास पोलीस करत आहेत.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel