
Pune : पुणे शहरात मेट्रोचं जाळं पसरत असून वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने विविध सुविधा केल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुणेकरांना आता तिसरा डबलडेकर उड्डाणपूल मिळणार आहे. हा उड्डाणपूल कोथरुड डेपो येथे उभारला जाणार आहे. पुणे मेट्रो फेज - 2 च्या विस्ताराचा भाग म्हणून हा डबलडेकर बांधला जात आहे. हा उड्डाणपुलाचा विस्तार वानवडी ते चांदनी चौक या मार्गावर होणार आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि नळ स्टॉप इथे डबल डेकर पूल उभारण्यात आला आहे. या डबल डेकर पुलाच्या डिझाइनचा वापर येथे केला जाईल. या दोन्ही ठिकाणी पूर्वी वाहतूक कोंडीची मोठी समस्या होती, परंतु डबल डेकर उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पुणे शहरात दोन ठिकाणी डबल डेकर उड्डाणपुलांचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. आता कोथरुडमधील या नवीन उड्डाणपूलमुळे पौड रोड आणि चांदनी चौकाकडील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.
|
|
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नळ स्टॉप येथील डबल डेकर पुलासाठी भूसंपादन करण्यात आलं होतं. मात्र या प्रकल्पात भूसंपादनाची समस्या येणार नाही. आता कोथरुड भागात जिथे डबलडेकर पूल उभारला जाणार आहे, तिथे पुरेशी रस्ता रुंदी उपलब्ध आहे. इथे भूसंपादनाची कोणतीही समस्या नाही. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा न येता हा डबलडेकर उड्डाणपूल बांधता येईल.
सुरुवातीला महामेट्रो या पुलाच्या बांधकाम कामासाठी निधी पुरवेल. आवश्यकता असल्यास पुणे महानगरपालिकेकडे आर्थिक मदतीसाठी संपर्क साधू'.तसंच, मेट्रो मार्गाचा सुमारे 700 मीटर भाग आधीच बांधला गेला आहे, तर उर्वरित 1.123 किलोमीटरचं काम अजून बाकी आहे. या नवीन प्रकल्पात 1.123 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो व्हायाडक्ट आणि कोथरुड बस डेपो आणि चांदनी चौक इथे दोन मेट्रो स्टेशन आहेत, असंही गाडगीळ यांनी सांगितलं.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी




























Subscribe to my channel


