
Pune : वडिलोपार्जित जमिनीच्या न्यायप्रविष्ट वादातून ज्येष्ठ नागरिकाने बुधवारी (दि. १५) सकाळी शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
नामदेव यशवंत जाधव (वय ६१, रा. वडकी, हडपसर-सासवड रस्ता ) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. ही घटना सकाळी पावणेबाराच्या सुमारास न्यायालयातील नवीन इमारतीजवळ घडली. त्या वेळी वकील व पक्षकारांची वर्दळ होती. नामदेव जाधव इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले. तेथून त्यांनी खाली उडी मारली. ते सुरक्षेसाठी लावलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळून जमिनीवर पडले. मोठा आवाज झाल्याने न्यायालयात तैनात पोलिस कर्मचारी व वकिलांनी तत्काळ धाव घेतली. गंभीर जखमी झालेले जाधव बेशुद्धावस्थेत होते. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली.
नामदेव जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले पत्र घटनास्थळी सापडले आहे. या पत्रात त्यांनी १९९७ पासून सुरू असलेल्या दिवाणी खटल्याचा क्रमांकासहित उल्लेख केला आहे. मागील २७ वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असून, हक्क मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड केली, अशा आशयाचा मजकूर या पत्रात असल्याचे सूत्रांनी सांगितले. जाधव दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडकी गावात राहात होते. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद असून, या जमिनीतील हिश्श्यासाठी जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याची न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ सुरू असल्याने जाधव नैराश्यात होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

