
Pune : “मंगलमूर्ती मोरया…’ च्या जयघोषासह ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती की जय…’ चे स्वर आता थेट बेल्जियममध्ये निनादणार आहेत. महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियममध्ये दरवर्षी साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात यंदा प्रथमच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मूर्तीचे पुण्यातील मंदिरात विधीवत पूजन करून नुकतीच ती महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली.
उपक्रमाचे संयोजक शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, रोहित लोंढे उपस्थित होते. गणरायाची अडीच फूट उंचीची ही प्रतिकृती पुण्यातील सुभाषनगर येथील श्री नटराज आर्ट्सचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख आणि राजेंद्र देशमुख यांनी साकारली आहे. ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे यांच्यासह इतर सदस्यांनी ही मूर्ती स्वीकारली. तब्बल १७५ देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून यानिमित्ताने बेल्जियममधील भारतीयांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.
|
Pune : पाकिस्तानी तुरुंगातून पळून जाण्याचा धाडसी बेत आखणारे ग्रुप कॅप्टन डी. के. परुळकर यांचे निधन |
शिरीष वाघमारे म्हणाले, ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीचे बेल्जियममध्ये आगमन हा महाराष्ट्र मंडळ बेल्जियमसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्रीय बांधवांसाठी गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार असून यानिमित्ताने श्रद्धा आणि संस्कृतीचा सुवास थेट महाराष्ट्रातून बेल्जियममध्ये पोहोचणार आहे.
गणरायाची बेल्जियममधील स्थापना ही आमच्यासाठी श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक ठरणार आहे.’ महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘गणरायाची मूर्ती बेल्जियममध्ये जात असल्याने ‘आता विश्वात्मके देवे’, हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पसायदानामधील श्लोक हा खऱ्या अर्थाने साध्य होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे.
बेल्जियममधील गणेशभक्तांची अपार श्रद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर असल्याने गणरायाची मूर्ती त्यांना देण्यात आली आहे. जवळपास अडीच हजार मराठी बांधव त्याठिकाणी सक्रिय आहेत. तसेच २० ते २५ हजार भारतीय नागरिक उत्सवात सहभागी होतात. लोकमान्य टिळकांची समाज एकसंध होण्याची भावना, भारतासह परदेशात देखील घडत आहे, याचा आनंद आहे.’
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel

