Pune : पुण्यात पेट्रोलऐवजी पाणी, नागरिकांची वाहनं अर्ध्या रस्त्यात बंद; शहरातील पंपावरचा प्रकार

Pune : पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपवर पेट्रोल डिस्पेन्सर मशीनमधून चक्क पेट्रोल ऐवजी पाणी भरून देण्यात आलं आहे. त्यामुळे HP कंपनीच्या पेट्रोल पंपावर आलेले दुचाकी वाहन मोठ्या प्रमाणात बंद पडत असल्याने वाहन चालविणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाहूनगर येथील एचपी कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे.

Pimpri-Chinchwad News : लंडन ब्रिजवरुन ८० वर्षीय महिलेची आत्महत्या, पवना नदीत उडी मारुन आयुष्य संपवलं

वाहन चालकांच्या वाहनांमध्ये ८० टक्के पाणी आणि फक्त २० टक्के पेट्रोल भरून दिल्याने वाहन बंद पडू लागली आहेत. दुचाकी वाहन बंद पडल्यानंतर दुचाकी वाहन चालकांना अक्षरशः त्यांची वाहन उलट करुन पेट्रोलच्या टाकीतून पाणी बाहेर काढावं लागत आहे. पेट्रोल पंपाच्या टाकीची योग्य प्रकारे निगा न राखल्यामुळे टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply