Pune : आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको; फक्त सातबारा कोरा करा, महिलांची अजित पवारांकडे मागणी

Pune : आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देऊ नका. फक्त आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेले भामा आसखेड धरण लाभ पुनर्वसनाचे शिक्के काढा तसेच आमचा सातबारा कोरा करा, अशी मागमी खेड तालुक्यातील काळूस गावातील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात अजित पवार यांना उपोषणकर्त्या महिलांनी निवेदनही दिलं.                                                       

खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भामा आसखेड धरण लाभ पुनर्वसनाचा उल्लेख करण्यात आलाय. याविरोधात महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. आमच्या जमिनीवरील बेकायदेशीरपणे टाकलेला पुनर्वसनाचा उल्लेख काढा तसेच आमचा सातबारा कोरा करा, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांची आहे.

Pune : कॅम्पातील बर्गर किंगच पुण्यात किंग! व्यापारचिन्ह गैरवापराचा अमेरिकेतील बर्गर किंग कॉर्पोरेशनचा दावा जिल्हा न्यायालयाने फेटाळला

दरम्यान, या उपोषणकर्त्या महिलाच्या शिष्टमंडळाने शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी 'जनसन्मान रॅलीत' भेटून अजित पवार यांना राखी बांधली. आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, फक्त आमचा सातबारा कोरा करा, अशा आशयाचं निवेदन महिलांनी अजित पवार यांना दिलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. यातूनच महिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सांगलीतील महिलांनी भावा बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट सोन्याची राखी बनवली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ती भेट म्हणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडे सुपूर्द केली आहे. शहरातील महिलांना वर्गणी काढत तीन ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली आहे. ही सोन्याची राखी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी महिला आघाडीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी अजित पवारांना बांधण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply