Pune : धक्कादायक! पुण्यात पालिकेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या दारू पार्टी, १४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी

Pune : पुणे महापालिकेच्या घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातून मोठी बातमी समोर येत आहे. या वसतीगृहामध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी दारू पार्टी करत धांगडधिंगा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा टीव्ही बंद असणे, कुचकामी सुरक्षा व्यवस्थेमुळे वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमधील बेशिस्तपणा वाढत असल्याने इतर शांत विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिटं, तंबाखूची पाकिटं सापडली आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर समाज विकास विभागाने १४ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी केली आहे.

Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार, पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये चांगले शिक्षण मिळावे यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुण्यात राहण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे पुणे महापालिकेने घोले रस्त्यावर १०८ खोल्यांचे मोठे वसतीगृह बांधले आहे. या वसतीगृहामध्ये ४०० जणांची राहण्याची सोय आहे. पुणे शहरामध्ये विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा असल्याने यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो. महत्वाचे म्हणजे महापालिकेतर्फे या विद्यार्थ्यांना जेवणाच्या खर्चासाठी दरमहा २ हजार १५० रूपये इतकी रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. या वसतीगृहात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच ईडबल्यूएस प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

या वसतीगृहात अकरावी किंवा पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडणे अपेक्षित असते. पण असे असतानाही काही विद्यार्थ्यांनी वसतीगृह सोडले नाही. सध्या ४०० पैकी २२० विद्यार्थी हे जुने आहेत. यामधील काही जण पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून या वसतीगृहामध्ये राहत आहेत. त्यामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेश मिळत नाहीये. त्यामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply