Pune : खासगी गाडीवर लाल दिवा भोवला; IAS अधिकारी पूजा खेडकर यांची थेट वाशिमला बदली, काय आहे प्रकरण?

Pune : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. खासगी गाडीवर लाल दिवा आणि वरिष्ठांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झालीय. वरिष्ठ अधिकाऱ्याचे चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी पुजा खेडकर रुजू झाल्या होत्या. यांची अखेर बदली करण्यात आलीय.

आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आलीय. कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशन कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांत काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच आयएएस पूजा खेडकर यांना देखील ३ जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते.

Gujarat Bus Accident : सापुतारा घाटात भीषण अपघात; 70 पर्यटकांना घेऊन जाणारी बस कोसळली दरीत

आता आयएएस पूजा खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला होता. या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे चेंबर बळकावल्याचा आरोप केला होता. खेडकर यांनी खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी. तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचं देखील पुण्याचे कलेक्टर दिवसे यांनी म्हटलं होतं. खेडकर यांची मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती.

पुजा खेडकर या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मागील जून महिन्यात खेडकर यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच खेडकर यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्याची तक्रार होती. पूजा या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची मुलगी असल्याची माहिती मिळत आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply