Pune : वानवडीत खंडणीसाठी टपरीचालकाच्या कुटुंबाला गुंडांकडून मारहाण

पुणे : पानटपरी चालविण्यासाठी दरमहा खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे गुंड टोळक्याने टपरी चालकाच्या कुटुंबाला बांबूने मारहाण केली. ही घटना हडपसर येथील काळेपडळ परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

या संदर्भात काळेपडळ येथील एका ५२ वर्षीय टपरीचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार वानवडी पोलिसांनी प्रशांत तिकोटे (रा. काळेपडळ, हडपसर) आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पान टपरी चालवितात. तिकोटे आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना पान टपरी चालविण्यासाठी दर महिन्याला दोन हजार रुपये खंडणी मागितली. परंतु त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला.

त्यावर गुंडांनी फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि पत्नी हे पान टपरीवर असताना त्यांना बाबूने मारहाण करुन परिसरात दहशत निर्माण केली. या मारहाणीत त्यांच्या पत्नीचा हात मोडून गंभीर दुखापत झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक लांभाते तपास करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *