Pune: परदेशी नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या पु ल देशपांडे उद्यानचे गेट घेणार मोकला श्वास, अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Pune : सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यानाच्या गेटवर गेली अनेक महिने स्थानिक लोकांनी व पथारी धारकांनी उतमात चालवला होता. गेटच्या समोरच व्यवसाय लावून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. पूल देशपांडे उद्यानास परदेशी नागरिकांची वारंवार भेट असतानाही या ठिकाणी कोणत्याही कारवाईस हे पथारी व्यावसायिक जुमानत नव्हते.

याबद्दल मोठ्या प्रमाणात पोलिसांकडे व महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. मागील काही दिवस आमदार माधुरीताई मिसाळ यांनी या ठिकाणी कारवाई घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी (ता. १८) रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. स्थानिक पथारी धारकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला असतानाही पोलिसांनी विरोध डावलून कारवाई पूर्ण करण्यास पूर्ण मदत केली.

Pune : पुण्यात मर्सिडीजच्या गाडीखाली चिरडून दुचाकी चालकाचा मृत्यू , अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

या कारवाईसाठी महापालिका सहाय्यक आयुक्त संदिप खलाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, विभागीय अतिक्रमण निरीक्षक नारायण सावळे, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरूले, अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे, श्री कृष्ण सोनार, भिमाजी शिंदे, सुभाष जगताप, गणेश तारू, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्रीमती मेघा राऊत, सागर विभुते, प्रथमेश पाटील, विठ्ठल ओमास, मंथन आमले, श्रीमती किरण डवरी, अभिलेप कांबळे, पंकज आव्हाड, अमोल भालेराव श्रीमती ऐश्वर्या रखात, नितिन खैरनार, राकेश सोनावणे या सर्व अधिकान्यांनी जेसिवी एक, एक पाच, बिगारी सेवक एकतीस, आठ जवान महरा सुरक्षा बल, पोलीस अधिकारी पाच, महिला पोलीस दोन, हातगाडी आठ. लाकूडमाल दोन, एक टेवल एक याच्या सहाय्याने कारवाई केली 

पु ल देशपांडे उद्यानालगतच सदर पथ विक्रेत्यांना दिलेल्या नियोजित जागी ते व्यवसाय करीत नसल्याने व राजरोसपणे गेटच्या पुढे वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय करीत असल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्यांनी अशाच प्रकारे अनधिकृत पुन्हा गाड्या लावल्यास त्यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाईल व अधिकृत लायसन धारक असलेल्या विक्रेत्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply