Pune : ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई

Pune : राज्यातील अनेक शहरांमध्ये रस्त्यावरील सिग्नलवर तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. अनेकदा पैसे मागताना तृतीयपंथींकडून जबरदस्ती करताना दिसतात. त्यामुळे वाहन चालकांना त्रास होतो. अशामध्ये पुण्यातील तृतीयपंथींबाबत पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये यापुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. यासंदर्भात पुणे पोलिसांनी तृतीयपंथींवर काही निर्बंध लादले आहेत.

Pimpri Chinchwad Crime : बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक; लुबाडणूक करणारी टोळी ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथींवर पुणे पोलिसांकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. याबाबत पुणे पोलिसांनी निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील अनेक सिग्नलवर तृतीयपंथी नागरिकांकडून पैसे मागतात. यामुळे नागरिकांना त्रास होतो. या नागरिकांकडून पुणे पोलिसांकडे अनेक तक्रार आल्या आहेत. या तक्रारींनंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला.

तृतीयपंथी यांच्याबाबत पुणे पोलिसांनी आदेश जाहीर केले आहेत. सिग्नलवर उभे असलेल्या वाहनांना जर त्रास दिला तर या तृतीयपंथीवर होणार पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. फक्त सिग्नलबाबतच नाही तर घरगुती समारंभमध्ये देखील आमंत्रणशिवाय हजेरी लावण्यास तृतीयपंथींना प्रतिबंध करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी आजपासून हे आदेश जारी केले आहेत. जर पुणे पोलिसांच्या आदेशांचे तृतीयपंथींनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply