Pune : होळीपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

Pune : होळीपौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा आणि सभामंडप द्राक्षांनी सजविण्यात आला असून २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. तर ही द्राक्षांची आरास पाहण्यास पुणेकरांनी एकच गर्दी केली आहे.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले की, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते.

Sangamner Crime News : शुल्लक कारणावरून वाद, दोन मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या; संगमनेरमधील थरारक घटना

हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply