Pune : पुणे शहरात अवजड वाहनांना आजपासून प्रवेशास बंदी

Pune :  पुणे शहरात हाेणारे छाेटे माेठे अपघात टाळण्यासाठी तसेच सातत्याने हाेणारी वाहतुक काेंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी यासाठी पुणे शहर पोलिस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून (शनिवार, ता. 23 मार्च) हाेणार आहे.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; होळीसाठी निघालेले चाकरमानी अर्ध्यातच अडकले , ४-५ किमी वाहनांच्या रांगा

पुणे शहरातून सोलापूर, नगर, सातारा, मुंबई, नाशिक, सासवड, पौड, आळंदी या रस्त्यांवरून जाणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये ट्रक व इतर वाहनांनी येताना व जाताना शहरामधील अन्य मार्गाचा वापर करावा असे वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेशात म्हटले आहे.

या बंंदीमधून अत्यावश्यक सेवा या वाहनांना तसेच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस यांना वगळण्यात आले आहे. वाहतुकदारांनी बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन वाहतुक पाेलिसांनी केले आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *