Pune News : पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणात मिस्ट्री गर्ल आली समोर; मास्टरमाईंडच्या प्रेयसीच्या अटकेनंतर मोठी अपडेट

Pune News : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात मोठा अपडेट समोर आली आहे. आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर मदत करण्यासाठी एका तरुणीचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मुख्य आरोपी संदिप धुनिया याच्या प्रेयसीसह आणखी एक तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाईंड संदिप धुनिया याची प्रेयसी सोनम पंडित हिला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. सोनमकडे याप्रकरणीक कसून चौकशी केली जात आहे. या रॅकेटमध्ये सोनमची देखील सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या गडकरींना दिलेल्या ऑफरची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले,

सोनम आणि तिच्या मैत्रिणीच्या मदतीने ड्रग्स रॅकेटचे आर्थिक व्यवहार केले जात होते. संदीप धुनिया याच्याकडे असलेले पैसे या दोघी हवालामार्फत पाठवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करत सोडेतीन हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे १८०० किलो एमडी जप्त केले आहे. एमडी तस्करी प्रकरणातील आर्थिक व्यवहार हवालामार्फत झाल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply