Pune News : धक्कादायक! मेफेड्रोन प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग?

Pune News : दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ विक्री प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. हॉटेल कामगाराला  पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून निगडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले आहे. उपनिरीक्षकाचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे  एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar Politics : महसूलमंत्री विखेंना घरचा आहेर; भाजपच्या विवेक कोल्हेंच्या नेतृत्वात विखें विरोधात शिर्डीत मोर्चा

 नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी नमामी हा एका हॉटेलमध्ये कामाला आहे.  या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका उपनिरीक्षकाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपी नमामी याला पिंपळे निलख विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ विक्रीसाठी आला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. त्याच्या कडील सफेद रंगाच्या पिशवीत दोन कोटी दोन लाख रुपये किमतीचे एकूण २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply