Pune News : विद्यार्थ्यांसाठी मनसे रस्त्यावर! अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंचा पुणे विद्यापीठावर विराट मोर्चा; काय आहेत मागण्या?

Pune News :  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आज पुणे विद्यापीठावर विराट मोर्चा काढण्यात आला. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. अमित ठाकरेंसोबत आई शर्मिला ठाकरेही या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेकडून या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना  आज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी , शर्मिला ठाकरें सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सेनापती बापट रस्त्यावरील चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा विराट मोर्चा काढण्यात आला.

Crime News : वाशीतील प्रसिद्ध मॉलमधील स्पामध्ये सुरु होतं भलतंच काम; पोलिसांनी धाड टाकली अन्...

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या संदर्भात अमित ठाकरे यांनी कुलगुरुंशी चर्चा केली. मनसेच्या या विराट मोर्चामुळे विद्यापीठ चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचेही पाहायला मिळाले. मोर्चामध्ये शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

काय आहेत मागण्या?

  • मराठी भाषा भवन झालेच पाहिजे !

  • नाशिक व नगर उपकेंद्रांमध्येच विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध व्हायला हवीत.

  • विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा ऑनलाईन करा.

  • दुष्काळग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा.

  • विशाखा समितीत विद्यार्थिनींना प्रतिनिधित्व द्या!

  • वसतिगृहांचा सर्वांगीण दर्जा सुधारा.

  • १०,००० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांची निर्मिती करा.

  • शिस्त मोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईसाठी नियमावली बनवा !

  • विद्यापीठाने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग आणि प्लेसमेंट पोर्टल सुरू करावे. रोजगार मेळावे घ्यावेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply