पिंपरी : तळेगाव नगर परिषदेसमोर दिवसाढवळ्या गोळीबार, जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून

पिंपरी : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मारुती चौकातील नगर परिषदेसमोर आवारे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. नगर परिषद कार्यालयासमोर दुपारी ही घटना दोनच्या सुमारास घडली. आवारे तळेगांव दाभाडे नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्याला भेटण्यासाठी आले होते. मुख्याधिकाऱ्याला भेटून आवारे बाहेर पडले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या चौघांनी हल्ला केला.

दोघांनी गोळीबार केला. तर, दोघांनी कोयत्याने वार केला. एक गोळी डोक्याला लागली. आवारे काही वेळ निपचित पडले होते. त्यांना सोमटणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मातोश्री सुलोचना आवारे या तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. आवारे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आला आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *