Pune News : मित्रांसोबत पर्यटनासाठी गेला अन् जीव गमावून बसला; १२०० फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Pune News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हिणी मधील प्लस व्हॅली परिसरात मित्रासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा अंदाजे १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहन विरेश लोणी (वय २१ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. 

रोहन हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या तो पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होता. मंगळवारी रोहन आपल्या ५ मित्रांसोबत मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली याठिकाणी पर्यटनासाठी आला होता. यावेळी रोहन अंघोळ करण्यासाठी एका कुंडात उतरला.

Satara Accident News : पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्याने तो कुंडात बुडू लागला. इतर मित्रांनी रोहनला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांसह लोणावळा शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.

बाराशे फूट खोल दरीतील कुंडात उतरून रोहनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा कुंडात पडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मुळशी तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात.

उंच ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणे, कुंडात पोहण्यासाठी उतरणे, तसेच स्टंड देखील करतात. अशा कृत्यांमुळे जीव जाण्याचा धोका असतो. त्यामुळे याठिकाणी येताना पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये, असे आवाहन पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply