Pune Nashik Highway : टोल कर्मचारी यांच्याकडुन आरेरावी; पुणे- नाशिक टोलनाक्यांवरील प्रकार

पिंपरी चिंचवड : पुणे- नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी टोल नाक्यावर रात्री शालेय विद्यार्थी आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये तुंबड राडा होऊन हाणामारी झाली होती. या प्रकरणानंतर टोल कर्मचारी वाहन चालकांशी अरेरावी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Pune Ringroad Project : मेट्रोसाठी पाच मीटरची राखीव लेन; उड्डाणपूल १७ अन्‌ बोगदे १०

पुणे- नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावरीलच हा प्रकार आहे. या मार्गावरील चाळकवाडी टोल नाक्यावर शालेय विद्यार्थी व तोल कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली होती. यानंतर या टोल नाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये हा टोल कर्मचारी एसटी महामंडळाच्या गाडी चालकाला आर्वाच्छ भाषा वापरत असल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.  

हि दादागिरी थांबेल का?

पुणे-नाशिक महामार्गावरील या टोल नाक्यावर टोल कर्मचारी वाद घालत असल्याचे समोर आले आहे. मात्र येथील कर्मचारी वारंवार वाहन चालकांशी हुज्जत घालत अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून केला जात आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांची दादागिरी आता थांबेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply