Pune Narcotics Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, बार मालकासह ८ जणांना अटक

Pune Narcotics Case : पुण्यातील लिक्विड लिजर हॉटेलमध्ये सर्रासपणे ड्रग्ज पार्टी होत असल्याचा व्हिडीओ रविवारी समोर आला होता. या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली होती आता या ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. याप्रकरणी ८ जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार मालकांसह मॅनेजर आणि डीजे मालकासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी ४ कलामांतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. आज दुपारी या सर्वांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे.

Pune Drug Case : पुण्यात उडता पंजाब! एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन तरुणांची ड्रग्ज पार्टी

पुण्यातल्या हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात रविवारी रात्री पुणे पेलिसांच्या गुन्हे शाखेने आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने ५ जणांना ताब्यात घेतले होते. लिक्विड लिजर हॉटेलचा मालक, त्याचे तीन पार्टनर आणि एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे हॉटेल देखील सील करल पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची चौकशी सुरू आहे.

याप्रकरणी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या पार्टीप्रकरणी २ पोलिस कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

लिक्विड लिजर हॉटेलमध्ये ड्रग्ज कोण पुरवत होते?, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणांकडे ड्रग्ज कुठून आले?, या ड्रग्जची विक्री कोण करत होते? या सर्व बाजून पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुणे पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही देखील जप्त केले आहे त्याची देखील तपासणी सुरू आहे. या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती, अशी देखील माहिती समो आली आहे. आता या प्रकरणाचा पुणे गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply