Pune Municipal : भाडेकरू ठेवल्यास सोडावी लागणार ४० टक्क्यांची सवलत

पुणे - महापालिकेची १९७० पासून सुरू असलेली मिळकतकातील ४० टक्केची सवलत बंद झाल्यानंतर ते पुन्हा मिळवून घेण्यास पुणेकरांना यश आले आहे. मात्र शहरात २०१९ पासून नव्याने एक लाख ६७ हजार निवासी मिळकतींची नोंद झाली आहे. या मिळकतींमध्ये भाडेकरू राहत असल्यास संबंधित मिळकतधारकास ४० सवलत दिली जाणार नाही. महापालिकेकडून त्याची तपासणी केली जाणार आहे. पोलिसांकडील भाडे करार व मुद्रांक शुल्क कार्यालयाकडे झालेले भाडेकरार याची तपासली जाणार आहे.

पुणे महापालिकेतर्फे ज्या नागरिकांचे एक घर आहे आणि ते स्वतः त्या घरात राहत असतील तर त्यांना मिळकतकरात ४० टक्के सवलत दिली. जाते राज्य शासनाने ही सवलत काढून घेऊन २०१९पासून शंभर टक्के कर वसुली करण्याचे आदेश दिले होते. मात्र यामुळे बेसुमार कर वाढ झाल्याने पुणेकरांची कराच्या ओझाने कंबरडे मोडले. यामुळे पुणेकरांमध्ये महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या विरोधात भावना तयार झाल्या होत्या. पुणेकरांवर झालेल्या अन्यायाची अखेर दखल घेऊन राज्य सरकारने ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. २०१९ पासून केली जाणारी वसुली रद्द केली आहे. तर ज्यांच्याकडून थकबाकी वसूल झाली आहे त्यांची ही कराची रक्कम पुढील बिलांमध्ये समायोजित केली जाईल असे देखील स्पष्ट केले आहे.

२०१९ पासून शहरांमध्ये एक लाख ६७ हजार नव्याने निवासी मिळकतीची नोंदणी झालेली आहे या मिळकत धारकांकडून शंभर टक्के कर वसुली झाली आहे. त्यांना आता ४० टक्के सवलत दिली जाणार असल्याने त्यांनी जास्त भरलेली रक्कम पुढील बिलांमध्ये वळती केली जाईल. पण जे मिळकतधारक या नवीन मिळकतीत भाडेकरू ठेवणार आहेत त्यांना ही ४० टक्केची सवलत दिली जाणार नाही असे देखील महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यांचीही ४० टक्केची सवलत सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडून प्रत्येक मिळकतीचे तपासणी केली जाईल. तसेच या माहितीचे शहानिशा करण्यासाठी पोलिसांकडे असलेले मिळकतीचे भाडे करार, मुद्रांक शुल्क विभागाकडे झालेले भाडे करार याची देखील माहिती घेतली जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

एक मे पासून कर वसुली शक्य

पूर्वीच्या मिळकतकराची दिले तयार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे ४० टक्के सवलतीसह तयार असलेली बिल छपाई करून एक मे पासून वाटप करता येतील व बिल वसुली करणे ही शक्य होणार आहे.

ज्या नागरिकांनी ४० टक्के वसुलीचे थकबाकी भरलेली आहे, तसेच नव्याने नोंदणी झालेल्या एक लाख ६७ हजार मिळकतींमध्ये स्वतः मिळकत धारक राहत असेल तर त्यांच्या बिलामध्ये बदल करावे लागणार आहेत. मात्र ही संख्या कमी असल्याने त्याबाबतचे कार्यवाही पुढील काही दिवसात पूर्ण करून त्यांचे देखील सुधारित दिले वाटप करणे महापालिकेला शक्य होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply