Pune Municipal Corporation : पुणे महापालिका मालामाल ; तिजोरीत सात हजार ४६३ कोटी रुपयांची भर

Pune : मिळकतकर, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी आणि केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) अशा विविध प्रकारच्या कर व शुल्कापोटी २०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ७ हजार ४६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या विविध विभागांकडून महसूलवाढीवर भर देण्यात येतो. त्यानुसार या वर्षीही काही विभागांनी उद्दिष्ट पूर्ण केले, तर काही उद्दिष्टाजवळ पोहोचले आहेत. ३१ मार्चपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांकडून कर भरला जातो. त्यामुळे संबंधित विभागांच्या महसूलात काही प्रमाणात वाढ होणार आहे. महापालिकेने २०२३ -२४ वर्षाच्या अर्थसंकल्पात मिळकतकरापोटी २ हजार ४०० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळेल, असे उद्दिष्ट ठेवले होते.

Follow us -

Nawab Malik : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांची तब्येत बिघडली; कुर्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू

त्यानुसार, २८ मार्चपर्यंत मिळकतकर, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी, जीएसटी अशा विविध करांपोटी ७ हजार ४६३ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सलग तीन दिवस शासकीय सुट्टी आल्यामुळे गुरुवारी (ता. २८) एका दिवशी १८ कोटी १० लाख ३२ हजार ६७२ रुपये इतका मिळकतकर जमा झाला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply