Pune Mhada Lottery 2024 : घरासाठी म्हाडा लॉट्रीचा फॉर्म कसा भरायचा? वाचा एका क्लिकवर पात्रता आणि अटी

Pune Mhada Lottery 2024 : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वत:च्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांचं हे स्वप्न सत्यात पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाकडून तब्बल १५०६ घरांची सोडत काढण्यात आली आहे. आता यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

त्यामुळे या बातमीमधून अर्ज कसा भरायचा. त्यासाठी वय मर्यादा काय आहे? त्यासह अर्ज भरताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे? या सर्वच प्रश्नांची माहिती मिळवणार आहोत.

Pune Traffic Changes : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद

अर्जदारासाठी पात्रता काय?

म्हाडा लॉट्रीचा फॉर्म भरण्याआधी त्याची पात्रता जाणून घेऊ. यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे पॅनकार्ड असले पाहिजे.

उत्पनानुसार कोणत्या घरासाठी अर्ज करता येईल?

अर्जदाराचे मासिक उत्पन्न २५,००१ ते ५०,००० रुपयांपर्यंत असेल तर ती व्यक्ती लोअर इन्कम ग्रुप (एलआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतो.

ज्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न ५०,००१ ते ७५,००० च्या दरम्यान असेल त्यांना मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) सदनिकांसाठी अर्ज करता येईल.

अर्जदाराचे मासिक उत्पन्न ७५,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास (एचआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतात.

जर अर्जदाराचे मासिक उत्पन्न रुपये ५०,००१ ते ७५,००० रुपये दरम्यान असेल, तर तो/ती मध्यम उत्पन्न गट फ्लॅटसाठी अर्ज करू शकतात.

अर्जदाराचे मासिक उत्पन्न ७५,००० रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास उच्च उत्पन्न गट  फ्लॅटसाठी देखील अर्ज करू शकतात.

अर्ज कसा भरायचा?

म्हाडा लॉटरी पुणे २०२३ अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी, म्हाडा पुणे प्लॅटफॉर्मच्या www.mhada.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ‘रजिस्टर’ वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील.

पुढे युजरनेम नाव निवडा आणि पासवर्ड तयार करन दिलेल्या जागेवर भरा. पुढे दिलेली सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. सबमीटच्या आधी तुम्हाला तेथे तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरण्यात येईल.

म्हाडा पुणे लॉटरी फॉर्मवर एकदा आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. म्हाडा लॉटरी पुणे फॉर्मवर प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी केली जाईल. म्हाडा पुणे लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज सबमिट करा.

म्हाडा संपूर्ण राज्यात १३,०० घरे बांधणार

म्हाडाकडून तब्बल १३०४३ घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या घरांच्या बांधकामासाठी तब्बल 8 हजार ३१० कोटींची तरतूद करण्यात आलीय. यासाठी मुंबईत - ३६६०, कोकणात- ५१२२, तर पुणे-१५०६, नागपूर-१०७६, छ. संभाजीनगर- ५९०, नाशिक-१०९७ घरे बांधण्यात येणार आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply