Pune Mhada Lottery : पुण्यात घराचं स्वप्त पूर्ण होणार; म्हाडाकडून 4777 घरांसाठी सोडत जाहीर, कसा कराल अर्ज?

Pune Mhada Lottery :  पुण्यात आता स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे 475 आणि 561 घरांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने सोडत   जाहीर केली आहे.  विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल 4777 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली.  या सोडतीसाठी आजपासून (8 मार्च) अर्ज भरता येणार आहेत.

म्हाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. आज तीनवाजल्यापासून हा म्हाडाचा अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत 8 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत 10 एप्रिल रोजी रात्री 11:59 पर्यंत असणार आहे. अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत 12 एप्रिलपर्यंत आहे. म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी लागणार आहे तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. 

Uddhav Thackeray : "महिला शक्तीनं देशातील हुकुमशहा संपवावा"; उद्धव ठाकरेंचं महिला दिनी आवाहन

 म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – 2416

– म्हाडाच्या विविध योजना – 18

– म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – 59

– पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – 978

– 20 टक्के योजना पुणे महापालिका 745 आणि पिंपरी-चिंचवड 561 एकूण 4777 सदनिका

कोणत्या वर्षी किती नागरिकांनी मिळाली घरं?


-जून 2019  मध्ये 4756 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 1169 फ्लॅटच वाटप आतापर्यंत  ग्राहकांना करण्यात आले आहेत.  
-सप्टेंबर महिन्यात 2019 मधे 2488 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 1533 फ्लॅट वाटप ग्राहकांना करण्यात आले आहेत.
-जानेवारी 2021 मध्ये 5647 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 2060 फ्लॅट वाटप ग्राहकांना करण्यात आले आहेत. 
-जुलै 2021 मध्ये 2908 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 755 फ्लॅट वाटप ग्राहकांना करण्यात आलं आहेत. 
-जानेवारी 2022  मध्ये 4222 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी 2423 फ्लॅट वाटप ग्राहकांना करण्यात आले आहेत. 
-एप्रिल 2022 मध्ये 2703  घराची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 160 ग्राहकांना फ्लॅटच वाटप करण्यात आलंय. 
-जानेवारी 2023 मध्ये 6065 घरांची सोडत काढण्यात आली. मात्र यामधील एकही फ्लॅट अद्याप ग्राहकांना देण्यात आलेला नाही. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply