Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?


Pune Metro : पुण्यात सगळीकडे मेट्रोचे जाळे पसरत आहे. यामुळे पुणेकरांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचत आहेत.पुण्यात रोज हजारो लोक मेट्रोने प्रवास करतात. आता मेट्रोचे हे जाळे वाढवले जात आहेत. आता मेट्रोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

दक्षिण पुण्यात मेट्रोची पाच स्थानके असणार आहेत.स्वारगेट ते कात्रज मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये बदल करण्यात आला आहे.शहरातील दक्षिण भागातील स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये बदल करण्यात आले आहे.

या मार्गावर ३ ऐवजी ५ भूमिगत मेट्रो स्टेशन तयार केली जाणार आहे.त्यामुळे प्रवाशांना तर फायदाच होणार आहे. त्यांना आपल्या जवळच्या स्टेशनवरुन मेट्रो पकडता येणार आहे.

Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मागार्चे काम पूर्ण झाले आहे.वनाज ते रामवाडी, पिपंरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. यामधील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गाचे दोन्ही बाजूला विस्तारीकरण केले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड ते निगडी पर्यंत मार्ग असणार आहय याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मंजूरी देऊन त्याचेही काम निविदा काढून लवकरच सुरू केले जाणार आहे.

नवीन मेट्रो स्टेशनची नावे

मार्केटयार्ड -उत्सव हॉटेल चौक, बिबवेवाडी/सहकारनगर – नातूबाग, पद्मावती -श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ, बालाजीनगर- भारती विद्यापीठ, कात्रज – कात्रज बसस्टँड ,किनारा हॉटेल जवळ

पुणेकरांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरु होणाऱ्या मेट्रोबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा मेट्रो मार्ग हा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरु केला जाणार आहे. यामुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीपासून बचाव होणार आहे. त्यांना ट्राफिकचा सामना करावा लागणार नाही.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply