Pune Metro : गरवारे-डेक्कन आणि फुगेवाडी-दापोडी मेट्रोमार्गाची चाचणी यशस्वी; सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा

पुणे: पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली ट्रायल रन घेतली. ही ट्रायल रन यशस्वी झाल्याने आता पुणेकरांना लवकरच या मार्गावरुन मेट्रोने प्रवास करता येणार आहे. पुणे मेट्रोने दैनंदिन प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला, काल १५ ऑगस्ट २०२२ ला ८०,००० पेक्षा जास्त प्रवासी संख्या पार केली. 

पुणे मेट्रोचे वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक हे विभाग ६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर कार्यान्वित करण्यात आले होते. काल, १५ ऑगस्टला आझादी का अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने, पुणे मेट्रोने रिच १ वरील फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन आणि रिच २ वरील गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो अशी पहिली चाचणी पूर्ण करुन आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.

या चाचणीला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे सिव्हिल कोर्ट स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply