पुणे : गुन्हेगारी टोळ्यांना मध्यप्रदेशातून पिस्तुलाचा पुरवठा; सात जण अटकेत; १७ पिस्तूल जप्त

पुणे :  शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना बेकायदा देशी बनावटीची पिस्तुले विक्री प्रकरणात गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. पोलिसांच्या पथकाने सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीची १७ पिस्तुले तसेच १३ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हनुमंत अशोक गोल्हार (वय २४, रा. जवळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रदीप विष्णू गायकवाड (वय २५, रा. ढाकणवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अरविंद श्रीराम पोटफोडे (वय ३८ रा. अमरापुरता, शेवगाव, जि. अहमदनगर), शुभम विश्वनाथ गरजे (वय २५ रा. वडुले, ता. नेवासा, जि. अहमदनगर), ऋषीकेश सुधाकर वाघ (वय २५, रा. सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय २५, रा. खडले परमानंद, ता. नेवासा, जि. अहमदनगर), साहील तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (वय २१, रा. बालमित्र मंडळाजवळ, सूसगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरातील गु्न्हेगारी टोळ्यांना पिस्तुलांची विक्री करण्यात येत असून मध्यप्रदेशातून पिस्तूल  खरेदी करुन आणली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने आरोपी हनुमंत गोल्हार याच्यासह साथीदारांना पकडले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवार पेठेतील सिंचन भवन परिसरात सापळा लावून साहिल चांदेरेला पकडले. पोलिसांनी सात आरोपींकडून देशी बनावटीची १७ पिस्तुले, १३ काडतुसे जप्त केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक अजय जाधव, सुनील कुलकर्णी, सुरेश जायभाय भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळकेर, विट्ठल खेडेकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, प्रतीक लाहिगुडे, नितीन मुंढे, अमोल पवार, इम्रान शेख, निलेश साबळे, महेश बामगुडे आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply