Pune : ट्रकला जोरात धडकून चार चाकी गाडी आगीत खाक!

धायरी : मुंबई महामार्गावर जांभूळवाडी दरीपूल येथे चार चाकी गाडी ट्रकला जोरात धडकल्याने अपघात होऊन चार चाकी गाडी आगीत जळून खाक झाली. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. भारती विद्यापीठ ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने गेले. अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी येण्यासाठी उशीर झाला.अशी प्राथमिक माहिती समजते आहे. कात्रज नवीन बोगद्यातून दोन्ही वाहने बाहेर येऊन मुंबईच्या दिशेने जात होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *