पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! चांदणी चौकातील वाहतूक 10 एप्रिलपासून राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकातील नवीन उड्डाण पुलाचे उद्घाटन येत्या १ मे रोजी होणार आहे. या पुलाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून येथे १५ ते २० एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

चांदणी चौकातील हे काम दोन दिवस चालणार असून त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. चांदणी चौकातून जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले असून या काळासाठी हा पर्यायी रस्ता उपलब्ध असणार आहे.

१० एप्रिलला चांदणी चौकातील सर्विस रोड सुरू होणार आहे, त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक या दोन पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्या अनुषंगाने लवकरच परिपत्रक शासनाकडून जाहीर करण्यात येईल. यासंबंधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

हे असतील पर्यायी मार्ग

मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १० एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे 'एनएचएआय'कडून सांगण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply