Pune Koyta Gang : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ, हडपसर परिसरात दुकानांची तोडफोड; व्यापाऱ्यांना धमकावलं

Pune Koyta Gang : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला का नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. एकीकडे हिट अँड रनची घटना ताजी असतानाच दुसरीकडे शहरात पुन्हा कोयता गँगने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हडपसर परिसरात शनिवारी (ता. ३१) कोयता गँगच्या गुंडांनी दुकानांची तोडफोड केली आहे.

हातात कोयते घेऊन कोयता गँगच्या गुंडांनी फुरसुंगी भेकराईनगर येथील दुकानांची तोडफोड केली. यावेळी त्यांनी खंडणीसाठी व्यापाऱ्यांना देखील धमकावलं. इतकंच नाही, तर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक देखील केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Mumbai : मोठी बातमी! मुंबई विमानतळावरून १० किलो सोनं जप्त, कस्टम विभागाची कारवाई

या घटनेनं नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा कोयता गँगचे गुंड धिंगाणा घालत दुकानांची तोडफोड करत होते, तेव्हा आम्ही कायद्याला अजिबात घाबरत नाहीत, असं ओरडून सांगत होते. या प्रकारामुळे फुरसुंगीतील रहिवासी सुद्धा हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फुरसुंगीतील भेकराईनगर परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कोयता गँगचे गुंड आले. त्यांनी परिसरात धिंगाणा घालत व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावलं. स्थानिकांच्या माहितीनुसार, गुंडांच्या या टोळक्यामध्ये अभय गायकवाड उर्फ भुऱ्या उर्फ छोटा रावण तसेच त्याचे साथीदार अरविंद उर्फ नक्या अजय माने, गौरव मंडल, विजय बसवराज कुरले, माणिक नागेश सगर उर्फ वाढीव बबल्या यांचा समावेश होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply