Pune Ink Attack : कोर्टाबाहेर भावनांचा उद्रेक, विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न, वातावरण तापलं

Pune Ink Attack : कल्याणीनगर अपघातप्रकरणातील विधीसंघर्ष आरोपीचा वडील विशाल अग्रवालला आज पुणे कोर्टात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच पुण्यात भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला. कोर्ट परिसरात पोहोचताचविशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला.  विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात  आली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला.  वंदे मातरम संघटनेने हे पाऊल उचललं. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या हल्ल्यानंतर वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या सगळ्यांचे हात काळ्या शाईने बरबटले होते. त्यांनी सांगितली की, आम्ही विशाल अग्रवालच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर शाई पडली. पण नंतर तो पोलिसांमुळे बचावला. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातासाठी विशाल अग्रवाल हा त्याच्या मुलापेक्षा अधिक जबाबदार आहे. पुण्यातील पबवर कारवाई झाली पाहिजे, त्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे. आम्ही याठिकाणी विशाल अगरवालला धडा शिकवण्यासाठी आलो होतो. त्याच्या मुलाने दोन निष्पापांचे जीव घेतले आहेत. विशाल अग्रवाल याच्यावर आधीपासून गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

विशाल अग्रवालसाठी कोर्टात वकिलांची फौज

पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टात हजर केले आहे. अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक  करण्यात आली होती . विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्यासह वकिलांचा मोठी फौज कोर्टात दाखल झाली आहे. विशाल अग्रवाल यांच्यासह नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांच्या विरोधात  सुनावणी होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply