Pune : बंदुकीचा धाक दाखवून FC रोडवरील प्रसिद्ध हॉटेलचा ताबा, पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

Pune  : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलचा बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने ताबा घेतल्याची घटना समोर आली आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार तिचा शारीरिक, मानसिक छळ देखील करण्यात आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार विवाहित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 2018 मध्ये घरी दारु व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नानंतरही मारहाण करुन शारीरीक व मानसिक छळ केला. 

पतीने बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने पॉवर ऑफ अॅटर्नी करुन वडिलांचे हॉटेल नावावर करुन घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे. लग्नातील 1.70 कोटींचे दागिने आणि दोन कार पती व त्याचा भाऊ वापरत असल्याचे आरोपही महिलेने केले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply