Pune Heavy Rain : पुण्यामध्ये मुसळधार पाऊस; स्वारगेट, कात्रज, हडपसर परिसराला झोडपले

Pune News : पुण्यातील अनेक परिसरामध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडाली. पुणे शहरातील स्वारगेट , कात्रज , हडपसर या परिसरामध्ये अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. या परिसरात पावसाची धुव्वाधार बॅटींग सुरू आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गुरुवारी पाच वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कडक ऊन असतानाच अचानक शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला. पुणे शहरातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे. पुणे शहरातील स्वारगेट ,कात्रज, हडपसर भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे ऑफिस सुटल्यानंतर घराच्या दिशेने जाणाऱ्यांची धांदल उडाली.

दरम्यान, आज नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला. केरळच्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूचे एका आठवड्यानंतर केरळमध्ये दाखल झाला. यावर्षी मान्सूनने केरळमध्ये दाखल होण्यासाठी 8 जूनची तारीख गाठली. आता हळूहळू मान्सून पुढे सरकरत सक्रीय होईल

मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला असून तो लवकरच इतर ठिकाणी दाखल होणार आहे. हळूहळू पुढे सरकरत तो महाराष्ट्रात देखील दाखल होईल. मान्सून तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीला दिलासा मिळाला आहे. आता मान्सून कधी महाराष्ट्रात दाखल होतोय याची सर्वजण वाट पाहत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply