पुण्यातही बरसल्या गारा! वादळी वाऱ्यासह पावसाचाही तडाखा

Pune : राज्यात गेल्या काह दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. दरम्यान आज पुण्यात गारा बरसल्या आहेत. पुण्यातील कोथरूड परिसरात जोरदार गारा पडल्या. यासोबत पावसाचाही तडाखा बसला आहे. विजांचा कडकडाटासह जोराचा वारा देखील सुरू होता . पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ११ एप्रिल, मंगळवार सुरू होणारा हा अवकाळी पाऊस पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अनेक भागात पडणार आहे. 

गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत पुणे हवामान खात्याने (आयएमडी) आजपासून पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवत पुन्हा एकदा तणाव वाढवला आहे.

१३ आणि १५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply