Pune Girls Drug Matter : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरूणींचं काय चाललंय?

Pune Girls Drug Matter : सध्या पुणे शहरात अमली पदार्थ तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी याच्याशी संबंधित मोठं रॅकेट समोर आलं आहे. तसंच यामध्ये तरूणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे. पुणे शहरात तरूण तरूणींमध्ये अमली पदार्थ सेवनाचं प्रमाण देखील वाढलं आहे, याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. 

मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई'ने संपूर्ण राज्याला हादरवणारा एक व्हिडीओ समोर आणला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर  नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा हा व्हिडिओ  आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुणे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. पुणे शहरात नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न आता समोर येत आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसचा अंदाज, या जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट

पुण्यातील ड्रग्स प्रकरण ताजं असतानाच वेताळ टेकडीवर दोन महाविद्यालयीन तरुणींनी ड्रग्जचं सेवन केल्यानं 'नशेत धुंद' असलेला एक व्हिडीओ  आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे, तर दुसरी मुलगी ड्रग्जचं सेवन केल्याने नशेत बडबडताना दिसत आहे.

मराठी अभिनेता रमेश परदेशी  याने स्वतः हाव्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यानी म्हटलंय की, वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या, असं मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई'ने सांगितलं आहे.

पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन

व्हिडिओमध्ये दिसतंय की, नशेमध्ये धुत असलेल्या या मुलींना नीट उभंही राहता येत नाही. पिट्याभाईने पुण्याला हादरवणारा समोर आणला आहे. शहरात शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं  येतात. नशा करतात, कुटुंबीयांना याची कल्पना नसते. अशा घटनांमुळे घाबरायला होतं, असं रमेश परदेशी यांनी म्हटलं आहे.

महाविद्यालयीन तरूण तरूणी रात्रभर पब, हॉटेल, बारमध्ये पार्टी करतात. नशेत गुंग  होतात, पालकांचं याकडे काहीही लक्ष नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं  आहे. शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असणारं पुणे शहर आता नशेचं माहेरघर होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या तरूणींचा मदत केली आहे. त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply