Pune Fire News : पुण्यात एकाच दिवशी आगीच्या 3 मोठ्या घटना; अग्निशमन दलाची पुरती दमछाक

Pune Fire News : राज्यात एकीकडे राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा जल्लोषात साजरा केला जात असताना दुसरीकडे पुण्यात सोमवारी (२२ जानेवारी) आगीच्या 3 मोठ्या घटना घडल्या. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक झाली.

सुदैवाने तिन्ही घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले. पुण्यातील कुमठेकर रस्ता परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लॅटला सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं.

Shiv Sena Mla Disqualification : राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.  

या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीची दुसरी घटना कसबा पेठ परिसरात घडली. येथील तांबट हौद वाड्यातील एका घराला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ दिसत होते.

अग्निमन दलानच्या जवानांनी आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली. ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचं सांगितलं जातंय. तिसरी आगीची घटना शहरातील कॅन्टोमेंट परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. शिवाजी मार्केट नजीक मॉर्डन डेअरीमध्ये फटाक्यामुळे आग लागली.

अग्निशमन दलाकडून ४ फायरगाड्या आणि २ वॉटर टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी नाही मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात आगीच्या घटना वाढत आहेत. अग्निशमन दलाचे जवान जीवाची पर्वा न करता नागरिकांचा जीव वाचवत आहेत



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply